मी सचिन ज. घाग सध्या मी Chavandai Residency “A” co-op Hsg. Soc. Ltd. पारसिक नगर, कळवा, ठाणे मध्ये राहत आहे.
या पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये ३ इमारती आहेत त्या इमारतीची रचना खालील प्रमाणे आहे.
१. पहिली इमारत (Chavandai Residency “B” co-op Hsg. Soc. Ltd) ही ७ (२८ गाळे) मजली (Tower) तेच इमारत आहे व दुसऱ्या मजल्यापासून ४ गाळे आहेत त्या मधील २ गाळे हे १००० (प्रत्येकी २ Toilet & 2 bathroom आहेत.) Sq. Ft. आहेत इतर दोन ६७० Sq. Ft. आहेत. (तसेच पहिल्या मजल्यावरील २ गाळे हे १२०० Sq. Ft. (प्रत्येकी २ Toilet & 2 bathroom आहेत.)) इतर दोन ६७० Sq. Ft. आहेत. इमारतीला लिफ्ट आहे. Stilt parking आहे.
२. दुसरी इमारत (Chavandai Residency “A-1” co-op Hsg. Soc. Ltd) ही आहे ४ मजली. प्रत्येक मजल्यावर ४ असे एकूण (२० गाळे) आहेत. Stilt parking नाही. ग्राउंड मजल्यावर ४ गाळे हे ५३० Sq. Ft. आहेत, पहिल्या मजल्या पासून ते शेवटच्या मजल्या पर्यंत प्रत्येकी ४ गाळे आहेत पुढीलप्रमाणे १-गाळा ५८० Sq. Ft., २-गाळा ५९० Sq. Ft., ३-गाळा ५६५ Sq. Ft., ४-गाळा ५५० Sq. Ft. चे आहेत. (प्रत्येकी १-Toilet & १-bathroom आहेत.)
३. तीसरी इमारत (Chavandai Residency “A” co-op Hsg.. Soc. Ltd) हे दोन भागाची आहे खालील प्रमाणे,
अ. पहीला भाग – प्रत्येक मजल्यावर ४ असे एकूण (२० गाळे) आहेत. Stilt parking नाही. ग्राउंड मजल्यावर ४ गाळे हे ५३० Sq. Ft. आहेत, पहिल्या मजल्या पासून ते शेवटच्या मजल्या पर्यंत प्रत्येकी ४ गाळे आहेत पुढीलप्रमाणे १-गाळा ५८० Sq. Ft., २-गाळा ५९० Sq. Ft., ३-गाळा ५६५ Sq. Ft., ४-गाळा ५५० Sq. Ft. चे आहेत. (प्रत्येकी १-Toilet & १-bathroom आहेत.)
आ. दुसरा भाग – ही इमारत आहे ५ (२३ गाळे) मजली आहे. ग्राउंड मजल्यला ३ गाळे ५३० Sq. Ft. आहेत व १ल्या मजल्या पासून ते ५व्या मजल्या पर्यंत एकूण (२० गाळे) आहेत याप्रमाणे १-गाळा ५८० Sq. Ft., २-गाळा ५९० Sq. Ft., ३-गाळा ५६५ Sq. Ft., ४-गाळा ५५० Sq. Ft. चे आहेत. इमारतीला लिफ्ट आहे. फक्त १ Stilt Parking जागा आहे. (प्रत्येकी १-Toilet & १-bathroom आहेत.)
प्रत्येक इमारत ही बिल्डर ने वेगळी रजिस्ट्रेशन केली आहे वर दिल्या प्रमाणे.
या तीन इमारतीला १-लहान गार्डन व १-मोठे गार्डन व प्रत्येक इमारतीच्या बाजूला पार्किंग जागा आहे या मध्ये साधारण २० चार चाकी वाहने व ५० दुचाकी वाहने उभी राहू शकतात.
ही झाली माझ्या कॉम्प्लेक्स ची रचना.
माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तीन इमारतीचा कॉमन खर्चाची विभागणी कशी करावी?
या कॉमन खर्चात खालील गोष्टीचा समावेश आहे,
१. माली चा पगार.
२. कचरेवाल्याचा पगार.
३. कॉमन इलेक्ट्रिकल लाईट.
४. सीक्युरीटी चा पगार.
हा प्रश्न करण्याचे कारण खालील प्रमाणे आहे.
१. सध्या हा खर्च प्रत्येक गाळ्या पध्दतीने विभागाला जातो
अ. या पध्दतीमुले बिल्डिंग “ए-१” आणी “ए” यांना प्रत्येक महिन्याला संपूर्ण ३००० ते ४००० रुपये ज्यादा प्रत्येक महीना (तोटा सहन करावा लागतो.) रकम भरावी लागते त्या मुळे या दोन बिल्डिंग चा सेवींग फंड हा कूप कमी राहतो. त्या उलट बिल्डिंग “बी” ला ३००० ते ४००० रुपये चा फायदा प्रत्येक महीना होतो.
१. या वरती “ए-१” आणी “ए” या बिल्डिंग कमिटी ने खालील उपाय शोधून काढला तो असा की,
अ. वरील नमूद सगळे कॉमन खर्च हे प्रत्येक बिल्डिंग च्या पूर्ण गाळ्याच्या Sq. Ft. ची बेरीज करून प्रत्येक बिल्डिंगला Sq. Ft. नुसार लावून ते प्रत्येक बिल्डिंग करून घेतले जावे. या पध्दतीने तीनीही बिल्डिंग ला खर्च समान जाईलच व प्रत्येक बिल्डिंगचा सेवींग फंड सुद्धा समान राहील.
मला असे वाटते की मी तुम्हाला माजी बाजू मांडली आहे. कृपा करून वरील गोष्टीकरीता मला योग्य ते मार्गदर्शन द्यावे जेणे करून हा गुंता नीट सुटेल व प्रत्येक गाळे धारकाला समान खर्च/जमा राहिल.