माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या सासर्यांनी स्वतःचे रूम काही कारणांनी नवीन बिल्डिंगमध्ये घर मिळाल्यावर अदलाबदल करायची ठरवली होती पण त्यादरम्यान त्यांचे सासरे वारले. माझ्या वडिलांनी त्यानंतर मिळालेली सासर्यांनी रूम रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी डिक्लॅरेशन डीड बनवली होती, ज्यात त्यांनी नमूद केलं आहे की ही मी स्वतःहून डीड करतोय कारण माझे सासरे वारले त्यामुळे आम्ही ही मालमत्ता रजिस्ट्रेशन करू शकलो नाही आणि त्यात त्यांनी माझे दोन मामा आणि माझी आज्जी ह्यांचा नावाचा उल्लेख केला असून त्यात ह्या तिघांनी मला त्यांची power off attorney दिली आहे असं म्हटलं आहे पण तसे काहीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे माझ्या वडिलांनी रजिस्ट्रेशन फी त्यांच्या सासाऱ्यांचा नावावर भरली आहे, त्यासाठी ही जुनी डीड कॅन्सल होईल का? ह्यावर माझे मार्गदर्शन करावे